खळबळजनक! पुण्यात पुन्हा भरदिवसा गोळीबार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, पुणे, दि.१२: वानवडी परिसरात हांडेवाडी रस्त्यावर एका वाळू पुरवठादार तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पावणे एकच्या सुमारास घडली. यामध्ये तरूण जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस तेथे पोहोचले आहेत. 

मयूर हांडे (वय ३२, रा. वानवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हांडे हा वाळूचा मागणीनुसार पुरवठा करतो. दुपारी पावणे एकच्या सुमारास तो हांडेवाडी रस्त्याने जात असताना श्रीराम चौकात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी मयूरच्या गालाला चाटून गेली आहे. यात तो जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयाजवळ बिल्डरचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात दुसरी गोळीबाराची घटना घडली आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!