झिरपवाडीत तरुणाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण : झिरपवाडी, ता. फलटण येथे ४५ वर्षीय विवाहित तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली असून मयताच्या सासूने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली असून आत्महत्येच्या कारणचा शोध सुरु असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.

याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मयत मूळचा कापूरहोळ, ता. भोर येथील रहिवासी असून पत्नी व दोन लहान मुलांसह गेली काही दिवस तो झिरपवाडी येथे सासुरवाडीत रहात होता, झिरपवाडी येथे धरणाचे बाजूला त्याने विषारी औषध घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारार्थ उप जिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले, मात्र तपासणी नंतर डॉक्टरांनी मयत घोषीत केल्यानंतर फिर्यादीवरुन अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक लावंड करीत आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!