मुगाव येथे महिलेची रोटा वेटर मशीनमध्ये मान अडकल्याने मृत्यू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य,वाई, दि ६: वाई तालुक्यातील मुगाव येथे डबरी नावाच्या शेतातील गवत रोटा वेटरने काढत असताना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मशीनमध्ये मान अडकून राजश्री अशोक रावडे (वय ४९ )यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.त्यांच्या दुःखद घटनेमुळे मुगाववर शोककळा पसरली आहे.

याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक आनंदा रावडे रा.मुगाव ता. वाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक हे बाहेरगावी होते.त्यांना सकाळी 9वाजता घराशेजारी राहणारे लक्ष्मण सोंडकर यांनी मोबाईल वर फोन करून सांगितले की चिखली येथील दिलीप रामचंद्र वाघ यांना त्यांचे गवत काढण्याचे रोट वेटर मशीन घेऊन घराशेजारील डबरी नावाच्या शिवारात गवत काढण्यासाठी बोलावले होते.शेतातील गवत काढत असताना सकाळी नऊ वाजता रोटर मशीनमध्ये जास्त गवत अडकले.रोटर चालक दिलीप वाघ यांनी रोटर मशीन थांबवली. राजश्री यांनी मशीन मधील गवत काढत असताना अचानक मशीन सुरू झाली त्यात राजश्री यांची मान अडकली.त्यांना लगेच खाजगी वाहनाने वाई येथील रुग्णालयात आणले.परंतु तेथे डॉक्टर नसल्याने दुसऱ्या रुग्णालयातमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.वाई पोलीस तपास करत आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!