खासगी सावकारीच्या मनमानी कारभाराला चाप; परवान्यांचा इतिहास आणि व्याजदर होणार डिजिटल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्य सरकारने खासगी सावकारी व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, परवानाधारक सावकारांचे व्याजदर, परवान्यांचा इतिहास आणि ग्राहकांच्या तक्रारी डिजिटल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २६ ऑक्टोबर : ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये खासगी सावकारी कर्जाच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनेकदा कर्जदारांना अवाजवी व्याजदर आणि अटींची माहिती न दिल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने सर्व नोंदणीकृत सावकारांना त्यांचे व्याजदर व्यवसायाच्या ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे.

पारदर्शकतेला प्राधान्य आणि ऑनलाईन यंत्रणा

नवीन नियमांनुसार, परवानाधारक सावकारांविरोधात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची माहिती स्वतंत्र न ठेवता ती थेट संबंधित परवानाधारकाच्या परवाना इतिहासाशी जोडली जाणार आहे. तसेच कर्जदारांची माहिती आणि तपासणीचे अभिलेख डिजिटल प्रणालीवर उपलब्ध केले जाणार आहेत. यामुळे संबंधित सावकाराचा आधीचा रेकॉर्ड तपासणे प्रशासनाला सोपे होणार असून बेकायदेशीर कारभाराला मोठा आळा बसणार आहे. सहकार विभागाच्या विविध सेवांचे डिजिटायझेशन करण्याच्या निर्णयांतर्गत ही मोहीम राबवली जात असून, यामुळे कर्जदारांची होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!