• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

ठाकरे सरकार वाड्या-वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 2, 2020
in Uncategorized

स्थैर्य,मुंबई,दि २: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यावरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत एकूण सात निर्णयांना मान्यता देण्यात आली. 

1) सामाजिक आणि न्याय विशेष सहाय्य विभाग 

राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अशा वस्ती-वाड्यांना आता नवीन नावे देण्यात येतील. वाड्या-वस्त्यांना शाहूनगर, समतानगर, ज्योतीनगर, प्रगतीनगर, विकासनगर अशी नावं ठेवण्याचा विचार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी तसे संकेतही दिले होते. काळानुसार काही निर्णय घेण्याची गरज असते. यापुढे महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचं मुंडेंनी सांगितलं होतं. जातिवाचक नावांमुळे ग्रामीण भागात भेदाभेद आणि विषमता पसरते. मात्र समाजातील सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्याचा संदेश देण्यासाठी ठाकरे सरकारने अशा प्रकारचा आगळावेगळा निर्णय घेतला आहे. 

2) परिवहन विभाग 

कोविड19 च्या टाळेबंदीमुळे एसटी महामंडळाची वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळास राज्य शासनाकडून एक हजार रुपयांचे कोटींचे विशेष अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली. 

3 ) वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अकोला, यवतमाळ, लातूर आणि औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यांसाठी आवश्यक 888 पदांच्या निर्मितीसाठी मान्यता मिळाली आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी

4) उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग 

मुंबई विद्यापीठामधील एचटीई सेवार्थ प्रणालीमध्ये नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.

5) गृह विभाग 

डिसेंबर 2019 पर्यंतचे राजकीय/सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

6) कृषि विभाग 

केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (Prime Minister Scheme for Formalization of Micro Food Enterprises (PMFME) या योजनेस मान्यता देण्यात आली.

7) संसदीय कार्य विभाग 

विधानमंडळाचे 2020 चे चौथे (हिवाळी) अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.


Tags: राज्य
Previous Post

पतीच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरची विषारी इजेंक्शन घेऊन आत्महत्या

Next Post

सुमारे पाच महिन्यांपासून चीनमध्ये अडकलेले भारतीय अधिकारी व कर्मचारी लवकरच भारतात; आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

सुमारे पाच महिन्यांपासून चीनमध्ये अडकलेले भारतीय अधिकारी व कर्मचारी लवकरच भारतात; आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांच्या प्रयत्नांना यश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आज मलठणमध्ये सावरकर गौरव यात्रा; खासदार रणजितसिंह यांची उपस्थिती

एप्रिल 2, 2023

डॉ. देशपांडे हॉस्पिटलचा शुक्रवार, दि. ७ एप्रिलला उद्घाटन सोहळा

एप्रिल 2, 2023

राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा महामार्गांना जोडणार्‍या माढा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी ५५ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर; खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

एप्रिल 2, 2023

प्रवचने – मनुष्याने प्रपंचात कसे वागावे?

एप्रिल 2, 2023

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

एप्रिल 2, 2023

नव्या ई-ग्रंथालयाचा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अधिकाअधिक लाभ मिळावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एप्रिल 2, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

एप्रिल 2, 2023

लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

एप्रिल 2, 2023

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

एप्रिल 2, 2023

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अनिल केळगणे यांनी साधली आर्थिक प्रगती

एप्रिल 2, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!