खासदार रणजितसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा फलटण तालुक्यात सक्षम पणे काम करणार : जयकुमार शिंदे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, फलटण, दि. ५: माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी आगामी काळामध्ये फलटण तालुक्यात सक्षम होऊन प्रभावी पणे काम करत राहील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. 

भारतीय जनता पार्टी फलटणची बैठक फलटण नगर परिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या वेळी जयकुमार शिंदे बोलत होते. 

भारतीय जनता पार्टीच्या फलटण तालुक्यात सर्व सेलची संपूर्ण कार्यकारणी आठ तारखेपर्यंत जाहीर करावी. भारतीय जनता पार्टीच्या फलटण तालुक्यात सर्व सेलची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर देऊन आगामी पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टी फलटण तालुक्यात तळागळात पोहचून काम करणार आहे, याची खात्री सुद्धा खासदार रणजितसिंह यांना द्यायची आहे. असेही जयकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी युवा मोर्चाचे राज्य संपर्कप्रमुख सुशांत निंबाळकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, युवा मोर्चाचे फलटण तालुका अध्यक्ष नानासो इवरे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय पवार, भटक्या आणि विमुक्त जाती जमाती चे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. उषा राऊत, डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ. प्रविण आगवणे, डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ. सुभाष गुळवे, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष नितीन वाघ, शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रा. सतीश जंगम, अनुसूचित जाती जमातीचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन अहिवळे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राजेश शिंदे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष रियाज इनामदार, शहराध्यक्ष बबलू मोमीन , भाजपा तालुका उपाध्यक्ष किरण राऊत, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!