भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. ०३ : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. आज जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये 12 प्रदेश उपाध्यक्ष, 6 प्रदेश सरचिटणीस व 12 चिटणीस यांचा समावेश आहे. त्या शिवाय सात मोर्चा आणि 18 विविध प्रकोष्ठाची नियुक्तीही आज जाहीर करण्यात आली.

प्रदेश अध्यक्षपदाची सुत्रे चंद्रकातदादा पाटील यांनी फेब्रुवारीत स्वीकारल्यानंतर आज ही पदाधिकारी घोषणा करण्यात आली. कार्यकारिणीत तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र व सामाजिक विभाग लक्षात घेऊन सर्व विभागाना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. त्य़ाचबरोबर या पदाधिकारी कार्यकारिणीत 33 टक्के महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते व प्रसिध्दी माध्यम प्रमुख यांचीही नियुक्ती करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांसोबतच युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा यांच्या प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

पक्ष पदाधिकाऱ्यांशिवाय कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांशिवाय 68 जणांची कार्यकारिणी आहे. त्याशिवाय 139 जण निमंत्रित असून 58 जण हे विशेष निमंत्रित असतील. सर्व आमदार-खासदार हे कार्यकारिणीचे कायम निमंत्रित सदस्य असतील.

त्याशिवाय कोषाध्यक्ष, कार्यालयप्रभारी, सहकार्यालयप्रभारी, प्रदेश कार्यालयमंत्री व सहकार्यालमंत्री यांचीही आज घोषणा करण्यात आली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!