मोदींच्या व्हॅक्सिन टूरनंतर मोठी बातमी : कधीपासून वापरात आणणार कोवीशील्ड लस – काय म्हणाले सीरम इंस्टीट्यूटचे CEO ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.२८: कोरोना व्हॅक्सीनविषयी देशासाठी
चांगली बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शनिवारी व्हॅक्सीन टूरनंतर
पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) चे CEO अदर पूनावाला यांनी
व्हॅक्सीनच्या तयारीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही
पुढच्या दोन आठवड्यांमध्ये कोवीशील्डच्या इमरजेंसी वापरासाठी अप्लाय करु.

भारतात
पाच व्हॅक्सीनवर काम सुरू आहेत. त्यापैकी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ
इंडिया (एसआयआय) कोवीशिल्ड तयार करत आहे. कोवीशिल्ड ऑक्सफोर्ड विद्यापीठ
आणि फार्म कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी मिळून बनवली आहे. ही लस सध्या
भारतात अंतिम टप्प्यात आहे.

आत्मनिर्भर भारतवर फोकस

पूनावाला
यांनी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हटले की, आम्ही आत्मनिर्भर भारताला लक्षात
घेऊन काम केले. व्हॅक्सीनच्या फेज-3 च्या ट्रायलच्या प्रश्नावर पूनावाला
म्हणाले की, आम्ही अजून प्रोसेसमध्ये आहोत. पंतप्रधानांनाही व्हॅक्सीन आणि
प्रोडक्शनविषयी माहिती आहे. येणाऱ्या काळात आपल्या समोर रेग्युलेटरी सारखे
चॅलेंज असतील.

400 मिलियन डोजवर विचार

सरकार
किती डोज खरेदी करणार हे अजून ठरलेले नाही, पण असे वाटते की, हेल्थ
मिनिस्ट्री जुलैपर्यंत 300 ते 400 मिलियन डोजवर विचार करत आहेत.
कोव्हशील्डचा मृत्यूदर कमी करण्यातही फायदा होईल. यामुळे हॉस्पिटलायजेशन 0%
होईल अशी अपेक्षा आहे. कोवीशील्डच्या जागतिक चाचणीत हॉस्पिटलाइजेशन 0%
राहिले. विषाणूचा परिणाम 60% कमी होईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!