
दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । आटपाडी । आटपाडी हे तालुक्याचे ठिकाण असून येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरत असतो .तालुक्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. परंतु या बाजाराला गालबोट लागण्यासारखे प्रकार अनेक दिवसापासून घडू लागले आहेत.
त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे प्रत्येक व्यक्ती मोबाईल शिवाय राहू शकत नाही, अशा मोबाइलची चोरी बाजारातून होत आहे .वरच्या खिशामध्ये अनेक जण मोबाईल ठेवतात बाजारामध्ये काही वस्तू खरेदी करत असताना वरच्या खिशातून लहान मुलं मोबाईल काढून घेतात हे मोबाईल धारकाच्या सुद्धा लक्षात येत नाही आणि मोबाईल चोरल्यानंतर काही मिनिटातच ती लहान मुले गायब होतात
अशा अनेक मोबाईलच्या चोऱ्या झालेले आहेत, तसेच प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील यांनी नागरिकांनी सावध राहण्याचे आव्हान केले आहे.