नॅशनल पॉवर लिफ्टिंग मध्ये बारामतीची सानिका मालुसरेला सुवर्ण पदक


दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२३ । बारामती । औरंगाबाद क्रिडा संकुल येथे झालेल्या दिनांक 15 ते 20 जानेवारी मध्ये नॅशनल पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेस- 2023 स्पर्धे मध्ये बारामती क्रीडा संकुल ची कु – सानिका राजेंद्र मालुसरे ७६ किलो गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळवले आहे.

सानिका मालुसरे ही शेतकरी कुटुंबातील मुलगी असुन ती सध्या विद्या प्रतिष्ठान येथे शिक्षण घेत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पॉवरलिफ्टिंग संपुर्ण सेट मुळे तिला बारामती मध्ये सराव करने सोपे झाले आहे.
पॉवरलिफ्टिंग असोसियेशनचे पदाधिकारी अर्जुन पुरस्कार विजेते मिथुन जोसेफ, संजय सरदेसाई , राजन मेहेंदळे व पुणे हडपसर स्पार्क जिम यांनी मार्गदर्शन केले.

तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, महेश चावले व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे स्वीय सहायक हनुमंत पाटील व भावसार सायकल चे संचालक अविनाश भावसार आदींनी सानिका मालुसरे हिला सहकार्य व नेहमी पाठींबा दिला यानंतर होत असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी पदक मिळवण्या साठी प्रत्यनशील राहणार असल्याचे सानिका हिने सांगितले.


Back to top button
Don`t copy text!