बाबासाहेब ! तुम्ही सोबत आहात…….

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उठू देत कितीही धर्मांध वावटळी, वादळे
पेटू देत अंधभक्त बुडाला आग लागून
हा द्वेषाचा धूर भरकटत चाललेला गावागावात
तरीही नाही होणार पराभूत समता,बंधुत्व
कारण बाबासाहेब ! तुम्ही सोबत आहात
ईश्वराच्या नावावर भ्रम पसरवणारे अंधश्रद्ध बुवा
वाघ होऊन गुरकावत आहेत इथल्या परंपरेच्या जंगलात
सत्तेचे लांडगे क्रूर दात काढून फाडत आहेत एकमेकास
ज्ञानाला पळवून नेलेय पैशाने भांडवली जगात
अशावेळी बाबासाहेब पाठीवर आहे तुमचाच आश्वासक हात
हा सारा दंभ, उध्वस्त करून न्यायाचे राज्य आणायला
होय ,बाबासाहेब ! आता तुम्ही सोबत आहात
झेंडे विषमता पेरीत आहेत इवल्या निष्पाप कोकरात
हलग्या वाजवून गुलामगिरी लादली जात असेल का वासरात?
भेदरली आहेत शिक्षित पाखरे,कसे बांधायचे आयुष्याचे घरटे?
दमनाची आग साहून उठली आहेत त्याना करटे
पाप सौदे करून पळवून नेत आहे इथली पुण्याची कमाई
तरीही रोकत आहात तुम्ही हे माणुसकी कापणारे कसाई !
इथल्या उराउरात पेटली आहे सत्यशोधाची विवेकाची वात
परिवर्तन होणार बाबासाहेब ! तुम्ही सोबत आहात
तुम्ही दिलेल्या उजळ मार्गावरून कोण सोडत आहे गढूळ पाणी ?
प्रज्ञा,शील,करुणा बुद्धाची, कोण नाकारील वाणी ?
धर्मभडबुंज्यांच्या निरर्थक लाह्या खाऊन, कोण होईल सदाचारी ?
बावळयांच्या अज्ञानाची, किती काळ चालेल मक्तेदारी ?
देशप्रेम तुमचे बाबा, माणूसपण, मैत्रीभाव जगात भारी
नाही हिंसा,नाही द्वेष, माणसाच्या न्यायासाठी, जिंदगी सारी
गोंधळात हरवल्या लोकांना, तुम्ही युगयुग प्रेरणा देत आहात
कळवळा रोज गहिवरतो..बाबासाहेब ! तुम्ही रोज सोबत आहात
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,सातारा ९८९०७२६४४०


Back to top button
Don`t copy text!