
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण शहरातील शुक्रवार पेठ भागातील सामाजिक कार्यकर्ते अजिजभाई शेख यांनी पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक दहा-अकरा मधील विकासकामे व्हावीत म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले.
यावेळी अनुप शहा, सुनील पवार, लक्ष्मण शिंदे, महिला मोर्चाच्या पदाधिकारी सौ. उषा राऊत, सौ. विजया कदम, सौ. रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
