सांगवी येथे कृषिकन्यांनी टी-बडिंग (कलमे) करण्याच्या प्रात्यक्षिकासह केले मार्गदर्शन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त, कृषी महाविद्यालय, फलटण येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत सांगवी, ता. फलटण येथे शेतकरी व ग्रामस्थांना टी-बडिंग (कलमे) कशी करावीत, याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

गुलाबाच्या रोपामध्ये टी- बडिंग (कलमे) करण्यासाठी लागणारे साहित्य आणि अशी कलमे करण्याचे फायदे याविषयी सविस्तर माहिती कृषीकन्यांनी शेतकर्‍यांना दिली. बियाण्यापासून निर्माण होऊ न शकणार्‍या विविधतेचे गुणाकार करण्यासाठी बडिंगचा वापर केला जातो. फळझाडे, गुलाब तयार करण्याची ही एक सामान्य पद्धत आहे. घरगुती बागेसाठी किंवा व्यवसायासाठी नवनवीन प्रकारची गुलाबाची रोपे तयार करण्यासाठी टी-बडिंगचा वापर केला जात असल्याचे या विद्यार्थिनींनी निदर्शनास आणून दिले.

कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निबांळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित, विषयतज्ञ प्रा. संजय आडत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या पूजा चौधर, अनुजा भिसे, अंकिता कुंभारकर, तनुजा शिंगाडे, प्रणिता आगवणे, ऋतुजा भामे यांनी उत्कृष्ट पद्धतीने टी-बडिंग (कलम) कसे करायचे, याची माहिती दिली.

Back to top button
Don`t copy text!