यूपीआयवर अतिरिक्त शुल्क आकारल्यास क्यूआर कोड होणार ब्लॉक; केंद्र सरकारची व्यापाऱ्यांवर कडक कारवाईची तयारी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

ग्राहकांकडून यूपीआय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क वसूल करणाऱ्या दुकानदारांचा क्यूआर कोड ब्लॉक करण्याची कठोर योजना केंद्र सरकार आखत आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २० सप्टेंबर : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर लागणारा मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) ग्राहकांवर लादणाऱ्या दुकानदारांवर केंद्र सरकार कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ज्या व्यापाऱ्यांकडून ग्राहकांकडून बळजबरीने अतिरिक्त शुल्क उकळले जाईल, त्यांचा यूपीआय क्यूआर कोड थेट ब्लॉक केला जाण्याची शक्यता आहे. या पावलामुळे ग्राहकांना अनधिकृत शुल्कापासून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

MDR शुल्काचा भार ग्राहकांवर टाकण्यास बंदी

१५ ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट लागू होणार आहे. हा दर बँक आणि पेमेंट सेवा पुरवठादारांचा खर्च भागवण्यासाठी व्यापाऱ्यांवर लावला जाणार आहे. मात्र, अनेक व्यापारी हा खर्च थेट ग्राहकांकडून वसूल करण्याची भीती व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, हा दर व्यापाऱ्यांसाठी असून तो ग्राहकांवर ढकलण्यास पूर्णपणे बंदी असेल.

तक्रार निवारण यंत्रणा आणि कारवाई

नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे मागेल्यास त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी सरकार एक विशेष तक्रार निवारण यंत्रणा उभी करत आहे. तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करून संबंधित दुकानदाराचा क्यूआर कोड त्वरित ब्लॉक केला जाईल. क्यूआर कोड ब्लॉक झाल्यास व्यापाऱ्यांना डिजिटल पद्धतीने पेमेंट स्वीकारणे कठीण होणार असून, ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!