स्वप्नपूर्ती, ध्येयपूर्ती आणि वचनपूर्ती !!!


दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२४ | फलटण |
१४ जानेवारीला सामूहिक ‘राम नाम’ जप व रामरक्षा पठणाचा कार्यक्रम फलटणमध्ये महाराजा मंगल कार्यालयात पार पडला. त्यावेळी १०८ वेळा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असे एका कागदावर लिहून सर्वांनी मनोभावे राम नाम जप कुंडात सोडले होते. तेव्हा सर्वांना वचन दिले होते की, या कुंडातला जप अयोध्येला ‘रामलल्ला’पर्यंत नक्की पोहोचवू. आणि तसेच घडले. आपला जपाचा बॉक्स अयोध्येला सुखरूप पोहोचला आणि प्रतिष्ठापना सोहळ्यात भाग घेणारे पुण्यातील गणेश गुरूजी आणि आमचे स्नेही संजय दीक्षित यांच्या कृपेमुळे सर्वांनी केलेला जप ‘रामलल्ला’च्या चरणी अर्पण करण्यात आला.

गाभार्‍यात फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याने तेथील फोटो नाही काढता आला.परमानंद, आनंद आणि असीम समाधान त्यावेळी आम्हाला मिळाले. जय श्रीराम…


Back to top button
Don`t copy text!