• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

विजय सेल्समध्ये असुस आरओजी फोन ७ सिरीजच्या विक्रीला सुरूवात

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मे 18, 2023
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२३ । मुंबई । बहुप्रतिक्षित असुस आरओजी फोन ७ सिरीज आता खरेदीसाठी प्रत्यक्ष विजय सेल्स स्टोअर्समध्ये आणि त्यांची ईकॉमर्स वेबसाइट विजयसेल्सडॉटकॉमवर उपलब्ध आहे. एप्रिलमध्ये सुरूवातीला विजय सेल्स या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल साखळीने यापूर्वीच्या आरओजी फोन ६ सिरीजच्या लाँचदरम्यान अत्यंत यशस्वी सहयोगानंतर भारतात आरओजी फोन ७ आणि आरओजी फोन ७ अल्टिमेट फ्लॅगशिप गेमिंग स्मार्टफोन्सच्या लाँचसाठी असुससोबत प्रीफर्ड रिटेल सहयोग केला.

विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्ता म्हणाले, ‘‘आम्हाला विजय सेल्स स्टोअर्समध्ये आणि आमच्या ईकॉमर्स वेबसाइटवर असुस आरओजी फोन ७ सिरीजच्या बहुप्रतिक्षित लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. आम्ही ग्राहकांना बाजारपेठेतील आधुनिक व सर्वात प्रगत तंत्रज्ञान प्रदान करण्याप्रती कटिबद्ध आहोत. असुस आरओजी फोन ७ सिरीजमधून अस्सल नवोन्मेष्कार दिसून येतो, जो गेमिंगप्रेमींना शक्तिशाली कार्यक्षमता व सर्वोत्तम वैशिष्ट्यांच्या माध्यमातून अद्वितीय गेमिंग अनुभव देतो.’’

७४,९९९ रूपये किंमत असलेला आरओजी फोन ७ १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन फॅन्टम ब्लॅक आणि स्टॉर्म व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच, आरओजी फोन ७ अल्टिमेट १६ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोरेजसह येतो, ज्यामध्ये मागील बाजूस आरओजी व्हिजन पीएमओएलईडी डिस्प्ले आहे आणि स्टॉर्म व्हाइट कलर व्हेरिएण्टमध्ये उपलब्ध असून याची किंमत ९९,९९९ रूपये आहे.

आरओजी फोन ७ सिरीज सूक्ष्मदर्शी गेमिंगप्रेमींना सर्वोत्तम फ्लॅगशिप गेमिंग व स्मार्टफोन अनुभव देण्याची खात्री देते. ही सिरीज आधुनिक ३.२ गिगाहर्टझ स्नॅपड्रॅगन® ८ जेन २ मोबाइल व्यासपीठ आणि अद्वितीय कार्यक्षमतेसाठी अत्याधुनिक गेमकूल ७ कूलिंग सिस्टमसह नो-कॉम्प्रोमाइज कार्यक्षमता देते. अपग्रेडेड थर्मल डिझाइन दीर्घकाळापर्यंत वापरानंतर देखील डिवाईसेसना अत्यंत थंड ठेवते. तसेच ऐरोअॅक्टिव्ह कूलर ७ पोर्टेबल २.१ साऊंड सिस्टमला सबवूफरप्रमाणे दुप्पट कार्यक्षम करतो.

डिवाईसेसमध्ये ६.७८ इंच एएमओएलईडी एचडीआर१०+ डिस्प्लेसह सर्वोत्तम १६५ हर्टझ रिफ्रेश रेट, जवळपास ७२० हर्टझचा गतीशील टच सॅम्प्लिंग रेट, २३ एमएसची जलद टच लेटन्सी आणि जवळपास १५०० नीट्सचा सर्वोच्च ब्राइटनेस आहे. ही सर्व वैशिष्ट्ये उल्लेखनीय गेमिंग अनुभव देतात. गेमिंग स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल सोनी आयएमएक्स७६६ फ्लॅगशिप रिअर कॅमेरासह उच्च दर्जाची लो-लाइट कार्यक्षमता, ८के रेकॉर्डिंग, व्हिडिओजसाठी ईआयएस व एचडीआर१०, तसेच ईआयएस व फोटोंसह उच्च दर्जाचा ४के देणारा ३२ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा आहे.

सिरीज ५१२ जीबी यूएफएस ४.० स्टोरेज आणि जवळपास १६ जीबी एलपीडीडीआर५एक्स रॅम देते. आर्मरी क्रॅट गेम कंट्रोल-सेंटरसह गेमिंग स्मार्टफोनमध्ये कंसोल-सारखा गेमिंग अनुभव, एअरट्रिगर अल्ट्रासोनिक ट्रिगर बटन्स आणि अद्वितीय गेम कंट्रोलसाठी १० मोशन कंट्रोल गेस्चर्स आहेत.


Previous Post

खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नांतून फलटण नगर परिषद क्षेत्रातील २ कोटी २० लाखांची विकासकामे मंजूर

Next Post

भारतीय मोबाइल ब्रँड लाव्हाने ‘अग्नी २’ स्मार्टफोन लॉन्च केला

Next Post

भारतीय मोबाइल ब्रँड लाव्हाने 'अग्नी २' स्मार्टफोन लॉन्च केला

ताज्या बातम्या

फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जून 8, 2023

श्रीराम कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : श्रीमंत संजीवराजे

जून 8, 2023

नवी मुंबई येथील बालाजी मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जून 8, 2023
अग्निशामक केंद्रा समोर वृषरोपण करताना अधिकारी व पदाधिकारी

पर्यावरण दिनी बारामती एमआयडीसी मध्ये वृषरोपण

जून 8, 2023
वृक्षारोपण करताना रोहिणी खरसे आटोळे व इतर

वडाच्या रोपट्याचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी

जून 8, 2023
कटफळ येथे वृषरोपण करताना मान्यवर

कटफळ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी वृषरोपण

जून 8, 2023

प्रवचने – भगवंताचे अनुसंधान राखावे

जून 8, 2023

महावितरण चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

जून 8, 2023

‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

जून 8, 2023

सातारच्या जिल्हाधिकारी पदी जितेंद्र दुडी; रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली

जून 7, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!