• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

भारतीय मोबाइल ब्रँड लाव्हाने ‘अग्नी २’ स्मार्टफोन लॉन्च केला

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मे 18, 2023
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२३ । मुंबई । भारतीय मोबाईल ब्रँड लाव्हाने आज जागतिक दर्जाचा अग्नी २ हा ५जी स्मार्टफोन अत्याधुनिक तंत्रज्ञानासह लॉन्च केला. हा मोबाइल मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन खरेदीदारांना भारतीय पर्याय प्रदान करतो. तंत्रज्ञान क्षेत्रातील अस्सल दमदार वळणावर या भारताच्या पहिल्या स्मार्टफोनमध्ये मीडिया टेकचा अत्याधुनिक डायमेंसिटी ७०५० प्रोसेसर असून तो वेगवान गेमिंग आणि अॅप अनुभव प्रदान करतो.

लाव्हा इंटरनॅशनल’चे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी सांगितले की, “अग्नी २ ५जी, इंडियन फायर पॉवर स्मार्टफोन उद्योगातील भारतीय अभियांत्रिकीचे प्रतीक आहे. हे उत्पादन रुपये २० हजार किंमतीच्या विभागातील भारतीय ग्राहकांच्या सर्व आकांक्षा लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर भारताचे तांत्रिक पराक्रम दर्शवणारे अग्नी हे उत्पादन तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्याचे जागतिक दर्जाचे गुणधर्म भारतीय स्मार्टफोनबद्दल तुमचे मत बदलून टाकेल.”

त्याची किंमत रुपये २१, ९९९ आहे. अग्नि २ हे उत्पादन २४ मे २०२३ पासून अमेझॉनडॉटइनवर उपलब्ध होईल. सर्व प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांवर रुपये २००० च्या सवलतीसह प्रारंभीक किंमत फक्त रुपये १९,९९९ ठेवण्यात आली आहे.

अग्नी २ सर्वात मोठा आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाच्या एफएचडी + स्क्रीनसह सर्वात मोठा आणि सेगमेंट सर्वोत्तम कर्व्हड् एमोलेड डिस्प्ले प्रदान करतो. याचा डिस्प्ले १.०७ बिलियन कलर डेप्थसह येतो, जो खरोखरच या सेगमेंटमध्ये स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणारा आहे आणि हे उत्पादन एचडीआर, एचडीआर १० आणि एचडीआर १०+ तसेच वाईडवाईन एल१ला सपोर्ट करते.

अर्गोनॉमिक ३डी ड्युअल कर्व्हड् डिझाइनसह अग्नी २ हे हाताळण्यास सोपा आणि अनुभवण्यास आनंददायी आहे. हे डबल ग्लास प्रोटेक्शनसह मॅट फिनिशसह प्रीमियम ३डी ग्लास बॅक डिझाइन आणते. यात अतिशय पातळ (२.३एमएम) बॉटम बेझल असून स्क्रीन ते बॉडी रेशिओ ९३.६५% आहे. हे आय कॅचिंग व्हिरिडियन कलर ग्लास बॅकसह येते.

अग्नी २चा सुपर ५०एमपी क्वाड कॅमेरा सेगमेंट फर्स्ट १.०-मायक्रॉन (1 um) पिक्सेल सेन्सरसह येतो, जो अधिक प्रकाश आणि समृद्ध तपशील अधोरेखित करतो. अग्नी २ मध्ये ८जीबी रॅमसह सर्वोत्कृष्ट २५६ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. जे थेट १६ जीबी रॅमपर्यंत वाढवता येते.

उत्कृष्ट गेमिंग अनुभव प्रदान करून, अग्नी २ नवीनतम थर्ड जेन २९००एमएम² व्हेपर चेंबर कूलिंग टेक्नोलॉजीसह येते, जे गेमिंग फोन गरम होणार नाही याची खात्री करते. याव्यतिरिक्त, एक्स-अॅक्सिस लिनीयर मोटर हॅप्टीक्स गेमिंग आणि टायपिंगचा अनुभव वाढवतात.


Previous Post

विजय सेल्समध्ये असुस आरओजी फोन ७ सिरीजच्या विक्रीला सुरूवात

Next Post

टंचाईमुक्तीसाठी ‘जलयुक्त शिवार’

Next Post

टंचाईमुक्तीसाठी ‘जलयुक्त शिवार’

ताज्या बातम्या

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ६७ शैक्षणिक संस्थांचा समावेश

जून 8, 2023

नानासाहेब थोरात यांची ‘जिनिव्हा’ परिषदे साठी निवड

जून 8, 2023

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

जून 8, 2023

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अमित वाडेकर यांचे व्याख्यान

जून 8, 2023

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

जून 8, 2023

अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी संधी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जून 8, 2023

त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

जून 8, 2023
रुग्णांना मार्गदर्शन करताना सुनंदा पवार व इतर

श्री श्री नेत्रालय बारामती येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

जून 8, 2023

फलटणमध्ये पालखी सोहळ्याचे बारकाईने नियोजन करा : जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी

जून 8, 2023

सुरवडीत साळुंखे – पाटलांच्या घरी मंत्री ना. विखे – पाटील

जून 8, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!