
दैनिक स्थैर्य । 11 जून 2025। फलटण । ताथवडा, ता. फलटण येथे कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषिदूतांचे आगमन झाले. ग्रामीण कृषी जागृकता व औद्योगीक कार्यक्रम 2025- 26 अंर्तगत हे कृषीदूत गावातील शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत
यावेळी सरपंच दशरथ शिंदे, उपसरपंच बंडु जाधव, ग्रामसेवक नंदकिशोर ओवाळे, ग्रामपंचायत शिपाई सोमनाथ राऊत तसेच प्रगतशील शेतकर्यांनी कृषीदूतांचे स्वागत केले.
तीन महिन्यांच्या कालावधीत कृषी जागरूकता, कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम मातीतील पिक पद्धती आधुनिक शेती पिक प्रात्यक्षिक, माती परिक्षण, पाणी व्यवस्थापन, बाजार भाव, किड व रोग व्यवस्थापन, हवामान सल्ला यावर कृषीदुत माहिती देणार आहे
या उपक्रमासाठी कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस एम साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा नितिशा पंडित व प्रा. संजय अडत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी कृषीदूत ओंकार पवार, विवेक जगदाळे, रोहन भोंग, सुजित आढाव, अक्षय धरणगुत्ते, प्रसाद कुंभार , अनुज दानवले, ओम कोकणे सहभागी झाले होते.