
दैनिक स्थैर्य । 11 जून 2025। फलटण । माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाणगंगा नदी व परिसरातील ओढ्यांची स्वच्छता करून बाणगंगा नदीचे रुपडे पालटले असून आगामी काळामध्ये फलटण शहरातून वाहणाऱ्या बाणगंगा नदी परिसर विकासासाठी रणजितदादा हे भरीव निधी आणणार असल्याची माहिती अशोकराव जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मध्यंतरी फलटण परिसरात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. यावेळी बाणगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुराचे पाणी नदीच्या नदी काठाच्या घरात शिरुन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
अशाप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा उजवा कालवा अधीक्षक अभियंता यांच्याकडून 6 फोकलेन मशीनद्वारे बाणगंगा नदी व ओढे साफ करण्याचे काम हाती घेतले. नदीमध्ये असणारा राडारोडा, नदीतील गाळ, वेगवेगळा स्वरुपाचा कचरा गोळा केला. यामुळेे बाणगंगा नदी पहिल्यांदा स्वच्छ होऊन नदीचे रुपडे पालटले.
यापुढे पाऊस आला तरी नदी काठावरील घरामध्ये पाणी जाऊ नये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काळजी घेतली. त्याबद्दल त्यांना मलठण, नदीकाठावरील शनिनगर, शुक्रवार पेठ, भैरोबा गल्ली, बुधवार पेठ, मंगळवार पेठ येथील नागरिकांनी धन्यवाद दिले.