
दैनिक स्थैर्य । 11 जून 2025। फलटण । जिंती फलटण येथे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि. 10 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी कृषी कन्यांनी गावकर्यांना झाडांचे महत्त्व, प्रदूषणाचे तोटे, पाण्याचे महत्त्व, ओला सुका कचरा याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ‘एक पेड माँ के नाम ही योजना राबविण्याचे आवाहन केले. कृषी कन्यांनी ग्रामस्थांना रोपांचे वाटप केले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाला कृषी कन्यांनी भेट दिली. त्यावेळी जिंतीचे सरपंच मंगल माने ,उपसरपंच शरद रणवरे, तलाठी दीपकराव नलगे, ग्रामसेवक नानासाहेब बनकर, कृषी सहाय्यक नितीन शिंदे यांनी कृषी कन्यांनचे स्वागत केले.
दहा आठवडे चालणार्या या कार्यक्रमामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकर्यांना दाखवली जाणार आहेत. यामध्ये शेतकर्यांच्या शेतीचा आणि दैनंदिन जीवनाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने विद्यार्थिनी प्रत्यक्ष गावांमध्ये वास्तव्य करून ग्रामीण भागातील शेतकर्यांना येणार्या अडचणी त्यांचे जीवनमान सामाजिक व आर्थिक स्थर संबंधित गावातील पीक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग व्यवसाय व इतर हवामानाविषयी जास्तीत जास्त माहिती विविध प्रकल्पाद्वारे कशी संपादित करता येईल, याची माहिती दिली जाणार आहे.
कार्यक्रमात वैष्णवी पुणेकर, वैष्णवी देवकर, प्रीती मांजरेू, वैष्णवी कारखेले, मुस्कान शेख, श्वेता निकम, कल्याणी कुटे कृषीकन्या सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.