
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, मुंबई, दि.४: आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पनवेल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
2018 साली अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे देण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापन करण्यात आले होते. यापूर्वी अर्णब गोस्वामी याची याप्रकरणी चौकशी झाली होती. कारवाई झाली नव्हती. आज या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.
