त्रेमासिक विवरणपत्र ईआर-1 31 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याच आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा दि.१५: जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष, स्त्री, एकूण ( त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1) सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारकर आहे.

त्रेमासिक विवरण पत्र (ईआर-1) दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswyam.gov.in या बेबपोर्टलवर सादर करावे. प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनेस युजर आयडी, रजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड यापूर्वीच दिलेला आहे. या संदर्भात काही समस्या असल्यास, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय भवन सातारायेथे अथवा कार्यालयाच्या 02162-239938 येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, राजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी कळविले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!