
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या महात्मा फुले भाजी मंडई येथे एक अनाथ व्यक्तीला पॅरालीसीसचा झटका आल्याने तो एका जागेवर पडून लोकांकडे मदतीची याचना करत होता. त्याचे प्राण वाचवण्याचे काम अनुप शहा यांनी केले.
भाजी मंडई मधील बसणाऱ्या भाजी मंडईतील काही लोकांनी शक्य ती मदत केली. भाजी मंडई मधील काही लोकांनी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप शहा यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अनुप शहा घटणास्थळी पोहोचले व स्वतः काही लोकांच्या मदतीने रुग्णास रिक्षा मध्ये घेवुन रूग्णालयात दाखल केले.
अनुप शहा यांनी दिलेल्या मदतीमुळे या अनाथ रुग्णाचे प्राण वाचले आहेत. अनुप शहा यांच्या या कामाचं कौतुक फलटण शहरात होत आहे.
