
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचे आता नुकतेच 16 रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामध्ये मारवाड पेठ फलटण येथील 40 वर्षीय महिला, गुणवरे येथील 6 वर्षीय मुलगी, 20 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 1 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाचा मुलगा, 9 वर्षाचा मुलगा, 30 वर्षीय महिला, 17 वर्षीय महिला, कोर्हाळे येथील 53 वर्षीय महिला, मंगळवार पेठ फलटण येथील 15 वर्षीय महिला, 41 वर्षीय महिला, मेटकरी गल्ली येथील 34 वर्षीय महिला, लक्ष्मीनगर येथील 62 वर्षीय महिला, मांडवखडक येथील 76 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय पुरुष असे एकूण आताच्या रिपोर्ट मध्ये फलटण तालुक्यातील 16 जणांचे कोरोनाबाबतचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 10 वाजता दिली.