फलटण बाजार समितीच्यावतीने लवकरच ‘अ‍ॅनिमल अ‍ॅम्ब्युलन्स’; श्रीमंत रघुनाथराजे यांनी दिली फेसबुक पोस्टद्वारे माहिती


स्थैर्य, फलटण दि.५ : तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी विविध योजना राबवणार्‍या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने लवकरच ‘अ‍ॅनिमल अ‍ॅम्ब्युलन्स’ म्हणजेच जनावरांसाठी रुग्णवाहिका सुरु करण्यात येणार असल्याची माहिती, बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

श्रीमंत रघुनाथराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले की, फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांकडील जनावरे म्हणजेच गाय, म्हैस, बैल, घोडा अशा प्राण्यांना उपचारासाठी ने – आण करण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग केला जाईल. तसेच फलटण संस्थानचे अधिपती स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी स्थापन केलेल्या फलटण बाजार समितीचे पहिले सभापती अ‍ॅड.विश्‍वंभर झिरपे यांच्या नावे आगामी काळात ‘अ‍ॅड.विश्‍वंभर झिरपे पशुवैद्यकीय रुग्णालय’ देखील बाजार समितीच्या आवारात सुरु होणार आहे. यानिमित्ताने तालुक्यातील शेतकर्‍यांची सेवा करण्याचे व्रत जोपासले जात असून याचे मोठे समाधान असल्याचेही, श्रीमंत रघुनाथराजे यांनी नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!