
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२६ | सातारा |
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट अतिवृष्टीचा इशारा आणि घाट परिसरातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन दि. १६ ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला आहे.
आपत्तीजन्य घटना मानवी नियंत्रणाबाहेर असल्याने जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने घाटात अपघात अथवा जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.