दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषदेत मेहतर सफाई कामगारांचे प्रलंबित प्रकरणे व मागण्यासंदर्भात मुख्याधिकारी हेतूपुरस्सर टाळाटाळ व कुचराई करीत असून दखल घेत नसल्याने संबंधित कर्मचार्यांवर अन्याय होत असल्याने अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना फलटण शहरच्या वतीने ७ डिसेंबर २०२३ रोजी पासून फलटण नगर परिषद समोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत, अशी माहिती फलटण शहराध्यक्ष मनोज मारुडा यांनी दिली.
संघटनेने केलेल्या मागण्या अशा :
- १) सफाई कामगारांची राहती घरे नावावर होणेबाबत.
२) लाड पागे कमिटीच्या शिफारशींनुसार शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती वर्ग – ३ याबाबत.
३) सफाई कामगार यांचा ७ वा वेतन आयोगाचा चौथा हप्ता मिळणेबाबत.
४) सफाई कामगार येथील १०, २०, ३० प्रमाणे वेतन निश्चित व फरक मिळणेबाबत.
५) मेहतर सफाई कामगारांचे समाज मंदिर पूर्णपणे नादुरूस्त असून तेथे पावसाळ्यात पाणी गळत असून तसेच वरचा मजला विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका करीता बांधकाम करणेबाबत.
६) मेहतर सफाई कामगार यांचे वसाहतीमध्ये कमानी बोर्ड करणेबाबत.
७) कामगार वसाहतीला संरक्षण भिंत बांधणेबाबत.
८) श्री रमेश वाघेला यांना सेवा ज्येष्ठतेनुसार व शैक्षणिक पात्रतेनुसार मुकादम पदी नियुतीबाबत.
९) सफाई कामगार पैकी ज्या कामगारांना घरे नाहीत त्यांना घरे मिळणेबाबत.
१०) वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन सफाई कामगार भरती करणेबाबत.
११) सेवानिवृत्त सफाई कामगार यांचे देय रकम तात्काळ देणेबाबत.
१२) अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटण यांची दरमहा आढावा बैठक घेणेबाबत.
या आमरण उपोषणात फलटण शहराध्यक्ष मनोज मारुडा यांच्यासोबत उपाध्यक्ष रमेश वाघेला, सचिव नितीन वाळा, खजिनदार निखिल वाळा, सहखजिनदार सारंग गलियल, कार्याध्यक्ष अनंत डांगे, महामंत्री लखन डांगे आदी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.