दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२३ | सातारा |
आसू (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला देशी दारूची बिगर परवाना विक्री करताना दि. ८ सप्टेंबर रोजी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकावर कारवाई करून ९१० रूपये किमतीची देशी दारूच्या १३ सीलबंद प्लास्टिक बाटल्या जप्त केल्या आहेत. बबन चिंतामण भिंगारे (वय ५५, रा. आसू, ता. फलटण) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अधिक तपास पो. ना. साबळे करत आहेत.