आम आदमी पक्षाकडून ३० मे रोजी भव्य रॅलीचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. २६ मे २०२३ | फलटण |
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून देशभरात स्वराज्य यात्रा आयोजित केल्या जात आहेत. त्याअनुषंगाने फलटण तालुक्यातील आम आदमी पक्षाकडून २८ मे ते ६ जून २०२३ दरम्यान पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेत सहभाग दर्शविण्यासाठी ३० मे रोजी सकाळी ९.३० वाजता फलटण शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे यांनी दिली.

ही रॅली मलठण, पाचबत्ती चौक, गजानन चौक, राजे उमाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी मार्गक्रमण करणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने फलटणकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आप’चे धैर्यशील लोखंडे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!