वडूथजवळ धावत्या कारने घेतला पेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 12 : वडूथ ता. सातारा येथे रविवारी सायंकाळी धावत्या कारणे अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कार चालक बचावला. याबाबत अधिक माहिती अशी, अतुल राजेंद्र किरवे (30 रा. भीमनगर, ता. कोरेगाव) हे त्यांच्या कारमधून वडूथ वरून किरकोळ साहित्य घेऊन भीमनगर येथे निघाले होते. मोरेवस्तीजवळील कॅनॉलजवळ आल्यानंतर कारच्या बॉनेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे किरवे यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. तोपर्यंत गाडीने पेट घेतला. किरवे यांनी प्रसंगावधान राखून गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उडी मारली. त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. आगीत गाडी अक्षरशः भस्मसात झाली. वडूथ गावातील विकी साबळे, हरिदास मोरे, संतोष साबळे, मंगेश बोडके, चंद्रकांत बिराजदार, उमेश साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी टाकून पेटलेली गाडी विझवली. आगीत कारचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!