सारथी सामाजिक संस्थेचा एक आदर्श-वीर पत्नीला अर्थार्जनासाठी दिले शिलाई मशीन


 

स्थैर्य, दहिवडी, दि. २१ : (विनोद खाडे) : देशाच्या सीमेवर लढणारा प्रत्येक जवान हा आपल्या साठी खरा नायक असतो,मात्र अनेक जवान देश रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. अनेकांच्या घरची परिस्थिती तशी बेताची असते.

काही महिन्यांपूर्वीच खटाव तालुक्यातील धकटवाडी गावचे फौजी हुतात्मा ज्ञानेश्वर जाधव यांना देशसेवेत असताना हौतात्म्य आले, आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली. परिवाराचा मोठा आधारस्तंभ देशसेवेच्या कामी आला. अशा नाजूक प्रसंगानंतर त्या परिवाराला धीर देण्यासाठी कुरोली सिध्देश्वर गावातील सारथी सामाजिक विकास संस्थेच्या आम्ही तरुणांनी परिवाराला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले, त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्था व्यक्तींकडून ही या परिवाराचे सांत्वन झाले. 

परिवाराला खंबीर साथ देत काहीही अडचण आल्यास परिवाराप्रमाणे एकत्र राहून सुख दुःख वाटून घेऊ अशा शब्दांत ज्ञानेश्वर च्या आई वडीलांना सारथी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी धीर दिला, तसेच मदत लागल्यास हाक देण्याचा आग्रह केला.

त्याच शब्दाला जागत काही दिवसांपूर्वी परिवाराशी चर्चा करुन उदरनिर्वाहाला एक साधन म्हणून १५ ऑगस्ट या मंगलप्रसंगी संस्थेतर्फे वीरपत्नी शुभांगी ताईला स्वतःच्या पायावर उभे राहून परिवाराला खंबीर साथ देण्यासाठी सारथी सामाजिक संस्थेच्या वतीने शिलाई मशीन कृतज्ञतापूर्वक भेट देण्यात आले.

खरंच सातारा हा सैनिकांचा वीरांचा जिल्हा 

पण प्रत्येकालाच सीमेवर जाऊन देशसेवा करता येईलच असे नाही पण आपण अशाप्रकारे फौजीच्या परिवाराची सेवा करुन देशसेवा करु शकतो :सारथी सामाजिक संस्था


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!