
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२३ | फलटण |
राजाळे (ता. फलटण) येथील एकाचा आंघोळ करताना पायर्यांवर पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून जगनाथ पुरूषोत्तम गुरव (वय ४०, रा. राजाळे, ता.फलटण) असे मयताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास राजाळे येथील जगन्नाथ पुरुषोत्तम गुरव हे येथील बारव येथे आंघोळीला गेल्यावर पायर्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागून त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या प्रकरणी अधिक तपास पो. ह. ओंबासे करत आहेत.
