मुंबईहून प्रवास करुन आलेला पिंपोडे बुद्रुक येथील एक कोरोना बाधित


वाघोली नंतर पिंपोडे बुद्रुक येथे कोरोनाचा शिरकाव

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, ता.२२,(रणजित लेंभे) : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे मुंबईहून आलेल्या एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काल शेजारील वाघोली गावांतील एक कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट आल्या नंतर आज पिंपोडे गावांत एक कोरोना बाधित असल्याचा शिरकाव झाल्याने गावांतील वातावरण शांत झाले आहे. गावाबाहेर व घिगेवाडी रस्त्यावर ज्या ठिकाणी होम कोरंटाईन केले तो परिसर प्रशासनाने पूर्ण बंद केला आहे. मुंबई-पुणेकरांमुळे ग्रामीण भागात कोरोना भूकंपाचे धक्के वाढू लागले असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई-पुण्यात नोकरी निमित्ताने स्थायिक असलेले चाकरमानी आता गावाकडे येऊन गावकऱ्यांच्या जीवाला घोर लावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरेगावच्या उत्तर भागात सोनके येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्याचा व त्याच्या सहवासातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सोनकेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. सरकारने मुंबई-पुणे येथून गावाकडे जाण्यासाठी परवानगी दिल्यामुळे दररोज शेकडो चाकरमानी गावच्या वेशीवर धडकत आहेत. अनेकांना विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. पिंपोडे बुद्रुक येथील 47 वर्षीय रुग्ण मुंबईत (खार)येथे मार्केटला गारमेंटच्या दुकानांत कामाला आहेत. आई, पत्नी, दोन विवाहित मुली व दोन भाऊ, भावजय असा गावी राहणारा परिवार आहे. दि.२१ मे रोजी ते गावी आले, गावा बाहेर असलेल्या घिगेवाडी रस्त्याला बांधलेल्या स्वतंत्र घरात होम कोरंटाईन केले होते, मात्र त्यांना प्रवासातच खोकला, सर्दी आणि घसाचा त्रास जाणवत होता, दुसऱ्या दिवशी पिंपोडे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेले असता, त्यांना लक्षण जाणवू लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले, जिल्हा प्रवेशाच्या ठिकाणी आणि जिल्हा रुग्णालयाने पाठवलेले स्वाब आज  पॉझिटिव्ह आले आहेत. आज जिल्हयात एकाच दिवशी चाळीस जणांना कोरोनाचा भूकंप झाला त्यापैकी कोरेगाव तालुक्यातील होलेवाडी आणि पिंपोडे येथील प्रत्येकी एक असे आज सकाळीच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सकाळी-सकाळी गावात समजली अन सगळा गावच थबकला. या रुग्णाचा गावात संपर्क न आल्याने मोठा अनर्थ टळला. वाठार स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांनी परिसर सील केला असून कडक पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!