स्थैर्य, वाई, दि.१६: वाई येथील सोनगिरवाडी येथे वरद हॉस्पिटलच्या परिसरात गॅरेजच्या पाठीमागे मटका अड्डा चालवणाऱया प्रमोद नारायण झाडगे(वय 38, रा. शिवाजीनगर सोनगिरवाडी वाई) यास पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडून मटक्याचे साहित्य हस्तगत केले आहे.
- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -
टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई येथील वरद हॉस्पिटलच्या परिसरात गॅरेजच्या पाठीमागे दि.15 रोजी सांयकाळी 5.30 वाजता मटका सुरु असल्याची माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस पथकास सुचना देताच तेथे छापा टाकला असता प्रमोद नारायण झाडगे हा मटका चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे मटक्याचे 1202 रुपयांचे साहित्य हस्तगत केले असून त्याच्यावर महाराष्ट्र कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल केला असून हवालदार धायगुडे हे तपास करत आहेत.