धोम कॉलनीतून एकजण बेपत्ता


स्थैर्य, वाई, दि.१६: धोम कॉलनी येथील ज्ञानदेव अपार्टमेंट येथून रविंद्र महादेव दगडे (वय 48) हे दि.13 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून बेपत्ता झाले आहेत. बाहेर फिरुन येतो असे सांगून निघून गेले. ते परत आले नाहीत. उंची पाच फुट पाच इंच, रंग सावळा, चेहरा उभट, बांधा सडपातळ, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, अंगात पांढऱया रंगाचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट, काळय़ा रंगाचा स्वेटर, काळय़ा रंगाची टोपी, पायात निळय़ा रंगाची स्लीपर असून याची खबर कमल पवार यांनी वाई पोलिसात दिली आहे. सहाय्यक फौजदार लोखंडे तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!