दैनिक स्थैर्य | दि. ३० एप्रिल 2023 | फलटण | फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती साठी आज मतदान पार पडले. यामध्ये सोसायटी, ग्रामपंचायत व व्यापारी मतदारसंघांमधून एकूण 2903 मतदारांपैकी 2665 मतदारांनी आपला मतदारांचा हक्क बजावला. म्हणजेच एकूण मतदानापैकी 92 % मतदान संपन्न झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी दिली.
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था म्हणजेच सोसायटी मतदारसंघांमधून 1634 मतदारांपैकी 1524 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील एकूण मतदानापैकी 93 % मतदान संपन्न झाले.
ग्रामपंचायत मतदार संघामधील 1187 मतदारांपैकी 1060 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला; म्हणजेच एकूण 89 % मतदारांनी या मतदारसंघातून आपला मतदाराचा हक्क बजावला.
व्यापारी व आडते मतदारसंघांमधून 82 मतदारांपैकी 81 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत एकूण 99% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव व निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान प्रक्रिया कोणताही अडथळा न येता संपन्न झाली.