स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान; 27 मार्चपासून मतदानाला सुरुवात, सर्व राज्यांचा निकाल 2 मे रोजी होणार जाहीर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 26, 2021
in देश विदेश

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २६:  देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि पुडुचेरीमध्ये निवडणुका होतील. पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका होणार आहे. याशिवाय, असाममध्ये 3 टप्प्यात, तमिळनाडू , केरळमध्ये आणि पद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात निवडणूक होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्चला होईल आणि सर्व राज्यांचा निकाल 2 मे रोजी जाहीर होईल.

बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा

जागा: 30 (पुरुलिया, बांकुड़ा, झाड़ग्राम, पश्चिम मेदिनीपुर, पूर्व मेदिनीपुर)

अधिसूचना: 2 मार्च

अर्ज भरणे: 9 मार्च

अर्ज मागे घेणे: 12 मार्च

मतदान: 27 मार्च

मतमोजणी: 2 मे

दुसरा टप्पा

जागा: 30 (बांकुड़ा, पश्चिमी मेदिनीपुर, पूर्व मेदिनीपुर, दक्षिण-24 परगना)

अधिसूचना: 5 मार्च

अर्ज भरणे: 12 मार्च

नाव परत घेणे: 17 मार्च

मतदान: 1 एप्रिल

तिसरा टप्पा

जागा: 31

अधिसूचना: 12मार्च

अर्ज भरणे: 19 मार्च

अर्ज परत घेणे: 22 मार्च

मतदान: 6 एप्रिल

चौथा टप्पा

जागा: 44

अधिसूचना: 16 मार्च

अर्ज भरणे: 23 मार्च

नाव परत घेणे: 26 मार्च

मतदान: 10 एप्रिल

पाचवा टप्पा

जागा: 45

अधिसूचना: 23 मार्च

अर्ज भरणे: 30 मार्च

नाव परत घेणे: 3 एप्रिल

मतदान: 17 एप्रिल

सहावा टप्पा

जागा: 43

अधिसूचना: 26 मार्च

अर्ज भरणे: 3 एप्रिल

अर्ज परत घेणे: 7 एप्रिल

मतदान: 22 एप्रिल

सातवा टप्पा

जागा: 36

अधिसूचना: 31 मार्च

अर्ज करणे: 7 एप्रिल

अर्ज परत घेणे: 12 एप्रिल

मतदान: 26 एप्रिल

आठवा टप्पा

जागा: 35

अधिसूचना: 31 मार्च

अर्ज भरणे: 7 एप्रिल

नाव परत घेणे: 12 एप्रिल

मतदान: 29 एप्रिल

आसाममधील निवडणुकीच्या तारखा

पहिला टप्पा

जागा: 47

अधिसूचना: 2 मार्च

अर्ज भरणे: 9 मार्च

नाव परत घेण्यासाठी: 12 मार्च

मतदान: 27 मार्च

मत मोजणी: 2 मे

दुसरा टप्पा

जागा: 39

अधिसूचना: 5 मार्च

अर्ज भरणे: 10 मार्च

अर्ज परत घेणे: 17 मार्च

मतदान: 1 एप्रिल

तिसरा टप्पा

जागा: 40

अधिसूचना: 12 मार्च

अर्ज भरणे: 19 मार्च

अर्ज परत घेणे: 22 मार्च

मतदान: 6 एप्रिल

केरळमध्ये एका टप्प्यात मतदान होईल

अधिसूचना: 12 मार्च

अर्ज भरणे: 19 मार्च

नाव परत घेणे: 22 मार्च

मतदान: 6 एप्रिल

तमिळनाडुत एका टप्प्यात मतदान होईल

अधिसूचना: 12 मार्च

अर्ज भरणे: 19 मार्च

नाव परत घेणे: 22 मार्च

मतदान: 6 एप्रिल

पुडुचेरीचा शेड्यूल

अधिसूचना: 12 मार्च

अर्ज भरणे: 19 मार्च

अर्ज परत घेणे: 22 मार्च

मतदान: 6 एप्रिल

निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, ‘मागच्या वर्षी सर्व जगासमोर कोरोनाचे संकट उभे होते, तेव्हा जगभरातील निवडणूक आयोगांसमोर निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान होते. अनेक देशांनी अशा परिस्थिती हिम्मत दाखवली आणि सर्व नियमांचे पालन करुन निवडणुका घेतल्या. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 18 जागांवर जून 2020 मध्ये निवडणुका घेऊन सुरुवात केली. आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान बिहारचे होते. तिथे 7.3 कोटी मतदानर होते. ती आमच्यासाठी अग्निपरीक्षा होती.’

अरोरा पुढे म्हणाले की, ‘मला सांगताना आनंद होतो की, बिहारच्या मतदारांनी विश्वास दाखवला आणि निवडणुकीत सहभाग नोंदवला. बिहारमध्ये अनेक अधिकाऱ्यांना कोरोना झाला होता, तरीदेखील निवडणुकीची तयारी केली. बिहारमध्ये 57.3% मतदान झाले, जे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त आहे.’

ते पुढे म्हणाले की, ’80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, अपंग आणि इतर महत्वाच्या नोकऱ्यांमध्ये असलेले लोकांना पोस्ट बॅलेटद्वारे मतदान करता येईल. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे लसीकरण होईल. याशिवाय, मतदान करण्यासाठी 1 तास वाढून दिला जाईल. 5 राज्यांमधील 824 जागांसाठी निवडणूक होईल. यासाठी 18.68 कटो मतदार असून, त्यांच्यासाठी 2.7 लाख मतदान केंद्र असतील.

‘18.68 कोटी मतदारांसाठी 2.7 लाख मतदान केंद्र’

आरोरा पुढे म्हणाले की, ‘असाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मेपर्यंत आहे. याचप्रकारे तमिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 24 मे, बंगालचा 30 मे, केरळचा 1 जून आणि पुडुचेरीचा 8 जूनपर्यंत आहे. 824 विधानसभा जागांसाठी 18.68 कोटी मतदार असतील आणि 2.7 लाख मतदान केंद्र बनवले जातील. तमिळनाडूमध्ये 66 हजार, असाममध्ये 33 हजार, बंगालमध्ये 1 लाख 1 हजार 916 मतदान केंद्र असतील.’

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध भाजप
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला तब्बल 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे आणि काँग्रेस आघाडीला 76 जागा मिळाल्या होत्या. केवळ 3 जागा मिळवणाऱ्या भाजपने यावेळी मात्र पश्चिम बंगालमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 42 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत यंदा सत्ताच स्थापन करू असे भाजपचे म्हणणे आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दरवेळी डावे विरुद्ध तृणमूल पाहायला मिळत होते. भाजपला यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र ही निवडणूक भाजप विरुद्ध तृणमूल अशी रंगली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, डावे आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांच्यात आघाडी शक्य आहे. फुरफुरा शरीफ यांच्या इंडियन सेक्युलर फ्रंटला 30 जागा दिल्या जाणार अशीही चर्चा आहे.

आसामात 126 जागांवर निवडणूक
2016 च्या निवडणुकीत या ठिकाणी भाजपला सत्ता मिळाली. भाजपला 126 पैकी 86 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 26, AIUDF ला 13 जागा आणि इतरास एक जागा मिळाली होती.

तामिळनाडूत 234 जागांवर चुरस
तामिळनाडूत 134 जागांवर विजय मिळवून AIDMK (अन्ना द्रमुक) आघाडी सत्ता स्थापित केली. गठबंधन ने सरकार बनाई थी। DMK (द्रमुक) आणि काँग्रेस आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या.

केरळमध्ये 140 जागांवर लढत
देशात एकमेव राज्य केरळमध्ये डाव्यांची सत्ता आहे. केरळमध्ये सध्या डाव्यांच्या 91 आणि काँग्रेसच्या 47 जागा आहेत. भाजपच्या आणि इतर एका पक्षाला प्रत्येकी एक-एक जागा मिळाली होती.

पुद्दुचेरीत 30 जागांवर निवडणूक
केंद्र शासित प्रदेश पुद्दुचेरीत 30 जागांवर निवडणूक होणार आहे. तर येथे 3 जागा नामनिर्देशित असतात. या ठिकाणी आतापर्यंत काँग्रेस आघाडीची सत्ता होती. पण, गेल्या आठवड्यात निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदारांनी काँग्रेस सोडल्याने सरकार अल्पमतात आले. परिणामी मुख्यमंत्री नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

वीज नियामक आयोग अध्यक्षपदाची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात जावे लागेल : भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

Next Post

खराब तिकीट मशीनमुळेे चुकीचे तिकीट दिले, बदनामीच्या भीतीने वाहकाचा बसमध्येच गळफास

Next Post

खराब तिकीट मशीनमुळेे चुकीचे तिकीट दिले, बदनामीच्या भीतीने वाहकाचा बसमध्येच गळफास

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 21, 2021

नाशिक वायुगळतीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल राज्यपालांना दुःख

April 21, 2021

दिनांक 20 एप्रिल रोजी शासनाने जाहीर केलेला लस घेतलेल्या लोकांचा डाटा खूपच बोलका आहे.

April 21, 2021

फलटण तालुक्यातील २१७ तर सातारा जिल्ह्यातील १६९५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३७ बाधितांचा मृत्यु

April 21, 2021

‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर

April 21, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा

April 21, 2021

वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी ‘एमजी मोटर इंडिया’चा पुढाकार

April 21, 2021

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 21, 2021

महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 21, 2021

फिनटेकमुळे बदलतोय शेअर बाजाराचा चेहरा

April 21, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.