बनावट FD च्या पावत्या बनवुन ७१ लाख ५० हजारांना गंडा; फलटण तालुक्यात खळबळ


स्थैर्य, फलटण, दि. २८ : स्टेट बँक ऑफ इंडिया फलटण या बॅंकेच्या पाठीमागील बाजूच्या ग्राहक सेवा केंद्रामधील चालकाने बनावट एफडीच्या पावत्या देऊन सुमारे 71 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी की मंगळवार दि 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.15 ते 4.15 वा. चे दरम्यान अजय शरद कुलकर्णी राहणार लक्ष्मीनगर फलटण याने स्वतःच्या फायद्याकरता स्वत च्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये सुरेश किसन झांझुरणे(वय 58) रा. नांदल (ता. फलटण) यांची बनावट एफडी पावती करून २० लाख रुपये स्वताचे खात्यामध्ये जमा केले. झांझुरणे व त्यांच्या पत्नी राजश्री यांची वीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे तसेच फिर्यादी यांचे मित्र साक्षीदार १) चित्रसेन यशवंत घाटगे – १४ लाख रुपये, २) बबन विष्णू शिंदे – २० लाख रुपये, ३) आप्पासो पर्बती बोबडे १७ लाख यांची एसटी महामंडळातून निवृत्त झाल्यानंतरची रक्कम आरोपी यांचेकडे सेवा केंद्रामध्ये एफ.डी. करण्याकरीता दिली असता त्याने खोटी पावती देवून सदर रक्कम स्वताच्या खात्यावर जमा केली आहे. व स्वताच्या फायद्याकरीता वापरली आहे व साक्षीदारांची फसवणूक केली आहे.

याबाबत सुरेश किसन झांजुर्णे यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये ग्राहक सेवा केंद्राचे चालक अजय शरद कुलकर्णी वय 48 वर्ष रा. राहणार अक्षत प्लाजा लक्ष्मीनगर फलटण यांच्या विरोधात फिर्याद दिली असून गुन्हा रजिस्टर नंबर व कलम -350/2020 भा. द. वि. 420, 467, 468, 471 दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  यातील 20 लाख रु पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी कुलकर्णीला अटक केली आहे.

फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे हे करीत आहेत. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!