फलटण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या ७ जागा बिनविरोध; दर्‍याचीवाडी सरपंचपदासाठी एकही अर्ज नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील पंचवार्षिक निवडणूक होणार्‍या चार ग्रामपंचायतींच्या गावनिहाय निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची संख्या जाहीर झाली असून या ग्रामपंचायतींमधील एकूण ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. दर्‍याचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने इथे सरपंचपदासाठी कोणीही इच्छुक नसल्याचे दिसत आहे, तर तालुयात पोटनिवडणूक होणार्‍या ९ ग्रामपंचायतींच्या १२ जागांपैकी तीन ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. तसेच तीन ग्रामपंचायतींच्या सहा जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.

गावनिहाय निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :

उपळवे ग्रामपंचायत :
सरपंच – २ अर्ज
प्रभाग १ – ३ जागा, ६ अर्ज
प्रभाग २ – २ जागा, १ बिनविरोध, एका जागेसाठी २ अर्ज
प्रभाग ३ – २ जागा, ४ अर्ज

दर्‍याचीवाडी ग्रामपंचायत :
सरपंच – ० अर्ज
प्रभाग १ – ३ जागा, ६ अर्ज
प्रभाग २ – २ जागा, ४ अर्ज
प्रभाग ३ – २ जागा, ५ अर्ज

जाधवनगर ग्रामपंचायत :
सरपंच – २ अर्ज
प्रभाग १ – ३ जागा, २ बिनविरोध, १ जागेसाठी २ अर्ज
प्रभाग २ – २ जागा, २ बिनविरोध
प्रभाग ३ – २ जागा, २ बिनविरोध

सावंतवाडी ग्रामपंचायत :
सरपंच – २ अर्ज
प्रभाग १ – ३ जागा, ६ अर्ज
प्रभाग २ – २ जागा, ५ अर्ज
प्रभाग ३ – २ जागा, ४ अर्ज

गावनिहाय पोटनिवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :

मलवडी ग्रामपंचायत :
प्रभाग ३ – १ जागा, २ अर्ज

सासकल ग्रामपंचायत :
प्रभाग ३ – १ जागा, २ अर्ज

मुरूम ग्रामपंचायत :
प्रभाग २ – १ जागा, २ अर्ज


Back to top button
Don`t copy text!