जन्म-मरणाच्या फेर्‍यातून बाळूमामांचे विचारच तारणार आहेत – प्रा. रवींद्र कोकरे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
चांंगले कर्म हेच जगण्याचे खरे वर्म आहे. दुसर्‍याची जाणीव हीच भगवंताची सेवा आहे. भक्ती करताना मनातील आत्मिक शक्ती वाढीस लागावी. जन्म-मरणाच्या फेर्‍यातून बाळूमामांचे विचारच तारणार आहेत. चांगली संतती हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे, असे ठाम प्रासादिक विचार कथाकार, प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी मांडले.

श्री संत सद्गुरु बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त खटकेवस्ती-गोखळी (फलटण) येथे ‘जन्माचे ते मूळ’ या प्रबोधनात्मक व्याख्यानात प्रा. कोकरे बोलते होते. कार्यक्रमाचे आयोजन पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी केले होते.

प्रा. रवींद्र कोकरे यांनी साध्या-सोप्या रसाळवाणीतून संत बाळूमामांचे चरित्र सांगितले. भाविक भक्तांच्या अंत:करणाला स्पर्श करून त्यांना गहिवरून आले. हसता हसता डोळ्यांच्या कडा ओलावून भाविक मंत्रमुग्ध झाले.

यावेळी संत बाळूमामा पूजन, सडा रांगोळी, महाआरती, पाळणा, पुष्पवृष्टी, महाप्रसादाचे आयोजन केले होते. युवकांनी स्वच्छता करून जन्मोत्सव साजरा केला. पहिलाच बाळूमामा जन्मोत्सव उत्स्फूर्त साजरा केल्याने ग्रामस्थ आनंदीत होते.

कार्यक्रमास युवराज खलाटे, दत्तात्रय काळे, बजरंग गावडे, बजरंग खटके आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!