दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
२५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक व मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये आगामी वर्षाच्या १ जानेवारी या अर्हता दिनांकावर वार्षिक पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबरोबर आगामी वर्षातील पुढील १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या तीन अर्हता दिनांकावर आधारीत आगाऊ अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
या पुनरीक्षण कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
- एकत्रीकृत प्रारूप मतदारयादी प्रसिध्द करणे – दि. २७ ऑटोबर २०२३
- दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी – दि. २७ ऑटोबर २०२३ ते ९ डिसेंबर २०२३
- विशेष मोहिमांचा कालावधी – विशेष शिबिरे, दि. ४ नोव्हेंबर व ५ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर व २६ नोव्हेंबर
- दावे व हरकती निकालात काढणे – २६ डिसेंबर २०२३ पर्यंत
- अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे – १ जानेवारी २०२४ पर्यंत
- मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे – ५ जानेवारी २०२४
या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, दुरूस्ती, मतदारयादीतून नाव वगळणे इ. कामकाज आपले मतदारयादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच ऑनलाईन वोटर हेल्पलाईन मोबाईल अॅप, वोटर पोर्टल या संकेतस्थळावरून करता येईल.