
दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२३ । बारामती । रिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफर्स, महाराष्ट्र यासंस्थेच्या ५ व्या वर्धापण दिनानिमित्त रिस्पेक्ट सन्मान सोहळा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. वेडिंग फोटोग्राफिमध्ये प्रेरणादायी कार्य करणाऱ्या फोटोग्राफर्स चा रिस्पेक्ट सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन आणि कॅमेरा पूजन करून आणि इतनी शक्ती हमे देना दाता या गीताने झाली.
या कार्यक्रमासाठी दिल्ली येथील फोटोग्राफी बिझनेस कोच अब्दुल्लाह अन्सारी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, यांनी यावेळी आपले मोटिवेशनल स्पीच देऊन वेडिंग फोटोग्राफर्स यांनी बिझनेस कसा करावा, निर्णय कसे घ्यावे इत्यादीचे सर्व फोटोग्राफर्स यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर रिस्पेक्ट अभियानातील श्री. सचिन भोर सर यांनी अभियानाबद्दल माहिती सांगितली आणि अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट केली.
रिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफर्स च्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी रिस्पेक्ट प्रेरणा आणि रिस्पेक्ट सन्मान पुरस्कार देऊन वेडिंग फोटोग्राफर्स यांना गौरविण्यात आले. रिस्पेक्ट प्रेरणा पुरस्कार अहमदनगर मधील श्री संजय दळवी सर यांना देण्यात आला. दळवी सर हे गेली ३५ वर्षे फोटोग्राफी व्यवसाय करित आहे. आज पर्यंत सरांनी समाजातील अनेक कलाकारांना, प्रतिष्टीत व्यक्तींचे फोटो आपल्या कॅमेराने सुंदररित्या टिपले आहे. या वर्षीचा रिस्पेक्ट सन्मान पुरस्कार पुणे येथील श्रीमती सुवर्णा शिंदे, मुंबई येथील श्री गणेश मेमाणे, बारामती येथील श्री मल्लिकार्जुन हिरेमठ आणि इस्लामपुर येथिल श्रीराम जाधव सर, संस्थापक अध्यक्ष, प्रोफेशनल फोटोग्राफर्स वेलफेअर असोसिएशन इस्लामपुर या सर्वांचा वेडिंग फोटोग्राफी मध्ये उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल सन्मान देऊन गौरविण्यात आले.
फोटोग्राफर यांना फोटोग्राफी व्यवसायात महत्वाचे असणाऱ्या गोडॉक्स, फोटो आऊल, एस. आर. के. लॅब यांनी मार्गदर्शन केले.
सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून २५० + फोटोग्राफर्स यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे अपडेट रेडिओ एफ्. एम. ९१.१ वर देण्यात आले. सोहळ्याचे सूत्र संचालन श्री अभिषेक शेलार यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार श्री विवेक आचार्य यांनी माणून सोहळ्याची सांगता ग्रुप फोटोने केली.