फलटण तालुक्याचा ५३ करोना बाधित; वडल्यात आणखी एक पॉसिटीव्ह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण :  वडले येथील पुर्वीच पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ४५ वर्षीय महिलेचा करोना अहवाल पाॅसिटीव्ह आला आहे. काल (दि. १६ जून) रोजी उपचार चालू असलेले २१ बाधित रुग्ण असून काल अखेर एकूण २७ रुग्ण बरे झालेले आहेत तर काल अखेर ५ जणांना करोना मुळे आपला प्राण गमवावा लागलेला आहे. तर तालुक्यात काल (दि. १६ जून) अखेर एकूण करोनाचे ५३ रुग्ण असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.

काल (दि. १६ जून) अखेर 2932 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील करोना केअर सेंटरमधील कन्फर्म वार्ड मध्ये एक रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड मध्ये ५० जण आहेत. तर संस्थामक विलीगीकरण कक्षात ४३ जण आहेत. काल (दि. १६ जून) रोजी तिघांच्या चाचण्या घेतल्या असून काल (दि. १६ जून) अखेर एकूण ७ करोनाचे अहवाल प्रलंबित आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!