5 जणांचा अहवाल आला पॉ‍झिटिव्‌ह तर 305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि. 24 : एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कराड तालुक्यातील बनवडी   येथील 32 वर्षीय पुरुष, तारुख येथील 25 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील 49 वर्षीय महिला, बोंडरी येथील 34 वर्षीय पुरुष, सातारा येथील वाढे फाटा येथील 56 वर्षीय महिला असे एकूण 5 रुग्णांचा रिपोर्ट कोविड बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड  यांच्याकडून 305 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!