कोरोना: 384 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 728 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

 

स्थैर्य, सातारा दि. 1: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत
असलेल्या 384नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 728 जणांचे नमुने
तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण
यांनी दिली.

विविध रुग्णालयात
आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 7, कराड तालुक्यातील 67, खंडाळा तालुक्यातील 7, खटाव तालुक्यातील 11,  कोरेगाव तालुक्यातील 27, महाबळेश्वर तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 22, पाटण तालुक्यातील 6, फलटण तालुक्यातील 36, सातारा तालुक्यातील 135, वाई तालुक्यातील 62  व असे एकूण 384 नागरिकांचा समावेश आहे.

728 जणांचे
नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह
नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 14,  उपजिल्हा रुग्णालय फलटण 41, कोरेगाव 65, वाई 46,
खंडाळा 79, रायगांव 48,  पानमळेवाडी 115,
मायणी 43, महाबळेश्वर 53, पाटण 15, खावली 24, ढेबेवाडी 49  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 136 असे एकूण 728
जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.
सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

घेतलेले एकूण नमुने
—   45057

एकूण बाधित
—  13997

घरी सोडण्यात आलेले
—   7592

मृत्यू — 397

उपचारार्थ रुग्ण
— 6008

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!