भारत-चीन सीमेवरील तणावाचा शेअर बाजारावर परिणाम


 

~
निफ्टी २६०.१० तर सेन्सेक्सची ८०० अंकांची घसरण ~

स्थैर्य, मुंबई, दि १:भारत-चीन सीमेवरील तणावामुळे भारतीय
निर्देशांकात आजच्या व्यापारी सत्रात नफ्यावर परिणाम झाला व तो २ टक्क्यांनी घसरला.
निफ्टी २.२३% किंवा २६०.१० अंकांनी घसरला आणि ११,३८७.५० वर स्थिरावला. एसअँडपी बीएसई
सेन्सेक्स २.१३% किंवा ८३९.०२ अंकांनी कमी होऊन ३८,६२८.२९ वर बंद झाला.

एंजल
ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह
यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात फ्युचर रिटेल (१९.९९%), ओएनजीसी (१.९९%),
फ्युचर कंझ्युमर लि. (४.८०%) हे आजचे टॉप गेनर्स ठरले. तर भारती एअरटेल (-२.१०%), रिलायन्स
इंडस्ट्रिज (-२.१८%), आणि इंडसइंड बँक (-५.१३%) हे सक्रियतेने व्यापार झालेले आणि दिवसातील
सर्वाधिक नुकसान झालेले शेअर्स ठरले. सर्वच क्षेत्रात घसरण दिसून आली. मेटल आणि फार्मा
निर्देशांक अनुक्रमे ४.३% आणि ५.२% नी घसरले. तर निफ्टी ऑटो ३.६% नी घसरले.

फ्युचर
रिटेल लि.:
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडने किरकोळ आणि घाऊक
व्यापारासह कंपनीच्या लॉजिस्टिक आणि वेअरहौसिंग व्यवसायासह २४,७१३ कोटी रुपयांची खरेदी
केली. कंपनीच्या शेअर्समध्ये १९.९९% ची वृद्धी झाली व त्यांनी १६२.३५ रुपयांवर व्यापार
केला.

एनएचपीसी
लिमिटेड:
कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १७% नी घसरला तर कंपनीचा
एकत्रित महसूल ६.५% नी वाढला. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ४.४१% नी घसरण झाली व
त्यांनी २१.७० रुपयांवर व्यापार केला.

सुझलॉन
एनर्जी लिमिटेड:
कंपनीचे एप्रिल ते जून या तिमाहीत एकत्रित
निव्वळ नुकसान ३९८ कोटी रुपयांवर गेले. कंपनीच्या शेअर्समध्ये १.३०% घट झाली व त्यांनी
३.८० रुपयांवर व्यापार केला.

 

रिलायन्स
इंडस्ट्रिज लिमिटेड:
कंपनीने नुकतेच किशोर बियाणी समर्थित
फ्युचर ग्रुपचे किरकोळ, घाऊक वस्तू, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस व्यवसाय विकत घेतले. तरीही
कंपनीचे स्टॉक्स २.१८% नी घसरले व त्यांनी २,०७०.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय
रुपया:
भारतीय रुपयाने देशांतर्गत इक्विटी बाजारातील अस्थिरतेमुळे
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत थोडीशी घट घेत ७३.६२ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक
बाजार:
आजच्या सत्रात आशियाई आणि युरोपियन निर्देशांकांची
संमिश्र कामगिरी दिसून आली. अमेरिकी चलन धोरणांच्या संकेतांनी जागतिक जोखीम मालमत्तांना
चालना दिली. नॅसडॅक, एफटीएसई एमआयबी आणि निक्केई २२५ च्या शेअर्समध्ये अनुक्रमे ०.६०%,
०.४८% आणि १.१२% ची वृद्धी झाली. तर एफटीएसई १०० आणि हँगसेंग कंपनीच्या शेअर्समध्ये
अनुक्रमे ०.६१% आणि ०.९६% ची घट दिसून आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!