कृशिदूत जोतीराम शेंडे यांच्या कडून मौजे भाडळी बु. येथे वृक्षारोपण कार्यक्रम


 

स्थैर्य, फलटण, दि. १: फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथील सातव्या सत्रामध्ये शिकत असलेल्या कु. जोतीराम शेंडे याने ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत मौजे भाडळी बु. येथे वृक्षारोपण केले व पर्यावरण संवर्धनाचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले.

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, प्रा. अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृशिदूत कु.जोतीराम शिवाजी शेंडे याने मौजे भादळी बु. येथील प्राथमिक शाळेच्या आवारात दुरांडा, गुलाब अशा प्रकारच्या झाडांची लागवड करून प्राथमिक शाळेच्या आवाराचे सुशोभिकरण केले. तसेच भादळी गावच्या ग्रामस्थांना वृक्षारोपणासाठी प्रवृत्त केले.

सदरच्या वृक्षारोपण कार्यक्रमास भादळी गावचे माजी सरपंच श्री. वसंतराव मुळीक, ग्रामसेवक सौ. माने मॅडम, ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय डांगे व भाडळी गावचे इतर सदस्य उपस्थित होते.

 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!