फलटणचे करोनाचे अजून ३५ अहवाल प्रलंबित : शिवाजी जगताप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›



स्थैर्य, फलटण : फलटण उपविभागातील ज्या संशयित रुग्णांचे स्त्राव तपासणी साठी पाठविलेले आहेत अश्या ३५ जणांचे करोनाचे अहवाल अजून प्रलंबित असून आज रोजी फलटण उपविभागात करोना बाधित ४१ रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण फलटण तालुक्यातून ४९ रुग्ण हे करोनामुक्त झालेले आहेत व सहा जणांचा करोना या आजारामुळे मृत्यू झाला आहे. फलटण तालुक्यात आज अखेर एकूण ९६ जणांना करोनाची लागण झाली असून फलटण तालुक्यामध्ये एकूण २४ मायक्रो कंटेंटमेंट झोन आज रोजी अस्तित्वात आहेत, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.

काल (दिनांक ५ जुलै) रोजी 2677 व्यक्ती होम क्वारंटाईन असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. तर फलटण येथील करोना केअर सेंटरच्या कन्फर्म वार्ड मध्ये 18 रुग्ण उपचार घेत असून सस्पेक्ट वार्ड मध्ये 62 जण आहेत व संस्थामक विलीगीकरण कक्षात कोणीही नाही असे हि उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!