
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : दहा मिनिटात जाउन येतो असे सांगून गेलेला २१ वर्षीय तरुण परत न आल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असुन योगेश गोरख खुडे वय २१ असे त्याचे नाव आहे. सोमवार दिनांक १३ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास योगेश हा दहा मिनिटात माघारी येतो असे सांगुन घरातून बाहेर गेला, परंतु तो परत न आल्याने वडिल गोरख श्रीरंग खुडे रा. काळूबाई नगर, मलठण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
