दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. फलटण संस्थेची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या, शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ५.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय, रिंगरोड लक्ष्मीनगऱ फलटण येथे आयोजित केली आहे. या सभेस सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिलीपसिंह भोसले यांनी केले आहे.
महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. फलटणचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, कर्नाटक आहे. या सोसायटीचे सन २०२र्२-२३ चे लेखा परीक्षण के. एन. मांढरे (चार्टर्ड अकौटंट, पुणे) यांनी पूर्ण केले आहे. या सोसायटीस दि. ३१ मार्च २०२३ अखेर १ कोटी २ लाख एवढा नफा झाला आहे. सोसायटीस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे, अशी माहिती सोेसायटीचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी दिली.